Mumbai..

मुंबई...

मुंबई ही फक्त आपल्या देशाची आर्थिक राजधानी नसून ती तरुण पिढीची स्वप्न पूर्ण करणारी एक जादुई नगरी आहे.
इथे येणारा प्रत्येक तरुण हा काही ना काही स्वप्ने घेऊन येतो आणि तो ती पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतो.असे नाही
की सर्वांचीच स्वप्ने पूर्ण होतात काही जणांची होतात तर काही लोक त्यांची स्वप्ने पूर्ण करत करत तिथलेच होऊन जातात.
अशी ही मायावी नगरी हा आमच्या देश्याचा श्वास आहे.


ह्या नगरी बद्दल जेव्हढा बोलावं ना तेवढा कमीच आहे. इथे प्रत्येक भागाला नाव देण्यामागे त्याची स्वतःची एक कहाणी
आहे. ह्या नगरीत तुम्हाला वेग वेगळ्या भाषेचा दर्शन नक्कीच होईल कारण इथे भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील लोक
सामावलेले आहेत. लोक म्हणतात कि मुंबई कधीच झोपत नाही होय मुंबई कधीच नाही झोपत कारण इथे सर्व आपली
स्वप्ने पूर्ण करण्याच्या नादात वेळेचे भान विसरून जातो. आजपर्यंत ह्या मुंबई खूप काही पहिला आणि सोसला आहे तरी
हि अजून ती तितक्याच मानाने डोलत आहे. तशी मुंबई हि पर्यटन साठी खूप प्रसिद्ध आहे. आणि त्यात मुंबईला लाभलेला
समुद्र तरी मुंबईची शान अजून वाढवतोय. खर तर मुंबई हि सात बेट एकत्र करून निर्माण केलेले शहर आहे.आणि जगातील
५वे मोठे शहर आहे. इथल्या सर्व पर्यटन स्थळांपैकी १ म्हणजे गेट वे ऑफ इंडिया ची कहाणी थोडी वेगळी आहे म्हणजे
ज्या इंग्रजांनी भारतात पाय ठेवला तो इथूनच आणि त्यांना जावे हि लागली ते इथूनच त्यांना पळवून लावले. पण २६/११ ला
जे अतेरिकी आले होते त्यांना मात्र कधी जात नाही आले.आजही छत्रपती शिवाजी टर्मिनस वर गेल्यावर त्या २६/११ ची
आठवण ताजी होते.मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे.रिझर्व्ह बँक,मुंबई शेअर मार्केट, राष्ट्रीय शेअर
मार्केट या महत्वाच्या आर्थिक संस्था शहरात आहेत. अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मंबई हे बॉलीवूड व मराठी उदयोगाचे
केंद्र आहे.
जसे नाण्याला दोन बाजू असतात तसे मुंबईच्या सुद्धा दोन बाजू आहेत एक चांगली आणि दुसरी वाईट. मुंबई मध्ये तुम्हाला
जितके श्रीमंत लोक दिसतील ना त्याहूनही जास्त तुम्हाला गरीब लोक दिसतील… पहिला चांगल्या बाजूवर बोलू.. मुंबई मध्ये
रोजगार खूप आहे तिथे प्रत्येकाला काही ना काही काम नक्कीच मिळते. तिथले रस्ते खूप चांगले आहेत उंच उंच गगनचुंबी
इमारती आहेत. वीकएंड त्याचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळे मनोरंजनासाठीचे पर्याय आहेत. मुंबईचे पोलीस सर्वात चांगले
पोलीस आहेत असे म्हणतात आणि ते खरेसुद्धा आहे. इतके सर्व चांगले आहे ह्या मुंबईमध्ये पण तितकेच वाईट पण आहे.मी असे
नाही म्हणत कि फक्त इथेच सगळ्या वाईट गोष्टी आहेत तुम्ही जगात कोठेही जा तुम्हाला ह्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात दिसतील.
मुंबई मध्ये सगळ्यात जास्त झोपडपट्टी आहेत. भलेही तुम्हाला कितीही उंच उंच इमारती दिसत असतील पण आजही किती तरी
लोक रस्त्यावर उघडे झोपलेले असतात. १ उत्कृष्ट उदाहरण सांगतो न्यूयॉर्क मध्ये एक सेंट्रल पार्क नावाचं एक उद्यान आहे. हे
उद्यान एकूण ७७८ एकर मध्ये पसरलेले आहे, म्हणजे आपले २८-३० शिवाजी पार्क बसतील एवढा मोट ते पार्क आहे. तर त्या पार्कची
काळजी कोणतेही सरकार घेत नाही तिथले लोक स्वतःच घेतात आणि ते पार्क १८५७ पासून अजून दिमाखात उभे आहे. तसेच
आपल्या मुंबईला सुद्धा एक पार्क आहे संजय गांधी पार्क ते किती लांब पसरले आहे माहिती आहे का? १०४ चौरस किलोमीटर..!
मी तुम्हाला १ सेंट्रल पार्क मध्ये किती शिवाजी पार्क बसतील हे सांगितलं. तर आता ह्या संजय गांधी पार्क मध्ये किती सेंट्रल पार्क
बसतील माहिती आहे का? तर ३० सेंट्रल पार्क बसतील एव्हडा मोठा जंगल आपल्याला निसर्गाकडून लाभलेला आहे तर आपण
काय करतोय…  बिल्डर लोक त्यावर हवा तसा कब्जा करत आहेत. आपले वन विभाग तर त्याकडे दुर्लक्ष्य करत आहे. जर
आपणच आपले वाणांची काळजी नाही घेतलो तर कोण घेणार कारण सरकार कडे वेळ नाही ह्या अश्या गोष्टीकडे लक्ष्य द्यायला.
बरं इतके सारे असून पण रोगराई आहेच आणि त्या रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यामध्ये जागाच नाही..


हा ब्लॉग मी इथेच थांबवत आहे कारण अजून अश्या खूप  गोष्टी आहेत त्या सांगायच्या आहेत…

पण एवढ नक्की सांगतो कि आपण एक सुजाण नागरिकसारखे राहिले पाहिजे.. जसा आपण आपले घर स्वछ ठेवतो
तसा आपला परिसर का नाही? का सगळी काम हे फक्त सरकारी कामगारांनीच करावी का? आपली काही जबादारी
नाही का?

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Balloons And Life

Be like a Gentleman